Marathi Story for kids | वाघोबाची गोष्ट | जलसाक्षरता

 Marathi story for kids | वाघोबाची गोष्ट

तुम्ही तुमच्या मुलांसाठी मराठी छान छान गोष्टी शोधत असाल तर तुम्हाला ह्या page वर लहान मुलांच्या नवीन मराठी गोष्टी मिळेल.आणखी मराठी सुविचार, मराठीत बोधकथा , पंचतंत्र मराठी गोष्टी,All Animals च्या Marathi katha, Marathi Goshti for kids and All students.तुम्ही ह्या मराठी kids stories आता pdf मध्ये सुद्धा save करू शकता तुम्हाला offline असल्यावर हे pdf files नक्की मदत करेल, तुम्हाला आणखी गोष्टी माहीत असेल तर आम्हाला नक्की कळवा व तुम्हाला आमच्या ह्या गोष्टी आवडल्या तर ह्या page ला share करायला विसरु नका, व आणखी काही suggestions असेल तर आम्हाला नक्की कंमेंट करा. तर चला सुरू करूया 👇मराठी छान छान गोष्टी.


वाघोबाची गोष्ट - Tiger Story In Marathi


Marathi story, marathi katha, marathi bodhkadha, tiger png,
Marathi Story for kids

आज रविवार असल्याने नाश्ता आटोपताच सारी मुले शाल्मलीच्या घरी जमली. तिची आजी सगळ्या मुलांना कधी रामायण , महाभारत, कधी शिवाजी महाराज तर कधी विविध शास्त्रज्ञणचा व देशभक्तीच्या गोष्टी सांगत असत.

  आजही मुले जमली आणि आजी गोष्ट गोष्ट म्हणून एकच कल्ला  करू लागली. "आले आले ह मुलांनो आज काय सत्याग्रहाची गोष्ट     

  सांगू की शिरीष कुमारची, की जुनीच पण तुंम्ही न ऐकलेली पुराणातली गोष्ट चालेल? 

    "आजी, आज एकदम काहीतरी वेगळी, आत्ताची इंटरेस्टिंग अशी गोष्ट सांग" मृण्मयीने म्हटले..

     जरा विचार करत आजीने म्हटले बर आज वाघोबाची गोष्ट ऐकूयात यावर आजी , आम्ही वाघाची गोष्ट ऐकायला काही लहान नाही बर का" मुलांनी एका सुरात उत्तर दिले.

     हो हो आज मी तुम्हाला आजकालच्या वाघाची, बिबट्याची गोष्ट सांगणार आहे; जुनी पंचतंत्रातील नव्हे बर ★ मुलांनो तुम्ही इतक्यातच ठाण्यात भरवस्तीत बिबट्या शिरल्याची आणि त्यांनी घातलेल्या धुमकुळाची बातमी वाचली ना ? 

  हो  तर मी वाचली बापरे बिबट्या सरळ एका इमारतीत, मग एका मॉलमध्येच शिरला होता. Watchman आणि इतर लोकही कसले घाबरले म्हणे...आपण तिकडे असायला पाहिजे होत यार:

  धृव व त्याचे दोन मित्र म्हणाले...

  अहह इथे बसून बोलणं सोपं आहे बाबा .. तिकडे लोकांची जाम तरकली होती. त्याने तर एका कुत्र्याला मारले म्हणता. नितीश म्हणाला.


Grandmother marathi story, grandmother story telling image,
Grandmother telling Marathi story for kids


  अरे, मागे वर्षा दिड वर्षापूर्वी ठाण्याच्या हिरानंदानी सोसायटीत पण बिबट्या शिरला होता माझ्या आत्या नि काकांनी समोरच पहिला होता . रोहितने सांगितले. हो हो. मध्यंतरी पुण्यात एन.डी. ए च्या जवळही वाघोबाने दर्शन दिल्याने लोकांची घाबरगुंडी उडाली होती..

  अजून दोन मुलांनी पुस्ती जोडली . आणि हे बिबटे सरळ आपल्या वस्तीत घुसून प्राण्यांना, कुत्र्यांना मारतात, आणि माणसावर हल्ला करतात म्हणजे काय ? हे फारच झालं ह." अजून काही मुलांनी आपले मत मांडले.

  तेवढ्यात राधा म्हणाली  अरे माझ्या आजीच्या जवळच्या गावातही असाच एक बिबट्या शिरला. त्यांनी गाईगुर तर मारलीच पण तो बिबट्या तर गावातल्या एक छोट्या मुलीला पकडून नेत होता, पण गावकऱ्यांनी खूप आरडाओरडा आणि हल्ला करून त्या बिबट्याला पळवून लावले."

  "आपल्यालाच जर हे बिबटे मारणार असतील तर त्यांना सरळ शूट करून मारायला पाहिजे ना ? अनुज म्हणाला .

  मुलांच्या आशा गप्पा ऐकता ऐकता आजीने मुलाना विचारले काय रे ह्या बिबट्याला मारले पाहिजे असं तुम्ही काही जण म्हणता , सांगा बर ते बरोबर आहे का ?

  आजी पण ह्या बातम्यांमध्ये गोष्ट काय ते सांग ना.मृण्मयी जरा कंटाळून रागावून म्हणाली. अग हो हो ह्या वाघांना मारणं बरोबर का ह्याच उत्तर द्या म्हणजे तुमची तुम्हालाच हळू हळू गोष्ट समजेल बर.

  नाही आजी त्यांची मुद्दाम शिकार नको करायला, हे बरोबर. पण ह्या जंगली प्राण्यांनी आपल्या वस्तीत का यायचे? जंगलात राहावे ना ! आपल्याच घरात येऊन आपल्याला मारायला लागले तर काय करणार सांग ना आजी . अनुजने म्हटले.

  अरे हो आपण आपले रक्षण करायला पाहिजे पण खरी गोष्ट आणि मेख इथेच आहे बर ! मुलांनो तुम्हीच जरा विचार करून सांगा की हे जंगली प्राणी आपल्या वस्तीत यायला लागले की आपणच हळूहळू करत त्यांच्या वस्तीत घुसलो ? त्यांच्या जमिनीवर , जंगलावर अतिक्रमण करत आपल्या गावच्या शहराच्या सीमा वाढवत गेलो . आपण तोडलेली झाडे झुडपे, जंगले हीच तर पूर्वी त्यांची घरे होती ना. जसजशी आपण जंगले झाडे तोंडत गेलो ; ते अजून आत जाऊन राहू लागले. पण बेसुमार वृक्षतोड करत आम्ही जंगलतोड करत आपली सिमेंट क्रॉंकीटची जंगले उभारत गेलो. जंगलाच्या अजून आतल्या आतल्या भागात जाता जाता त्यांना जागा अपुरी पडू लागली. झाडे जंगले कमी झाली. साहजिकच पाउस कमी होत गेला. पाणीसाठे सुकत चालले. जंगलाचा आणि एकुणच पर्यावरणाचा तोल आम्ही बिघडवून टाकला. वनजीवन आणि वन्यप्राण्यांचे स्वतःचे जीवनचक्र त्यांचे अन्नपानी हे चक्रच आम्ही पूर्ण विस्कळीत करून टाकले. त्यांचे आसरे आणि घरे आम्ही आमच्या घरासाठी वापरात   

 आणू लागलो. आता तुम्ही सांगा ते आधी आपल्या वस्तीत घुसले की आम्हीच त्यांची घरे जंगले झाडे नाहीशी केली ? शेवटी ते तरी जाणार कुठे ? तुम्हाला आवडेल उद्या तुमच्या चार खोल्यातून दोनच खोल्यात राहा किंवा परवा म्हटले की एकाच खोलीत राहून भागवा. आवडेल तुम्हाला तुमचे घर कोणी उध्वस्त केले तर ? 

 अरे म्हणून आपले वनरक्षक, वनाधिकारी, प्रानिप्रेमी हे ह्या वाघांना आपल्या हद्दीत ते घुसले तरी शक्यतो त्यांना अपाय इजा न करता कौशल्याने पकडून जंगलात किंवा प्राणी संग्रहालयात सोडतात बर.

 आजी कळला तुमचा मुद्दा, आणि आजच्या वाघाची गोष्टही. पण मग आपण करायचे तरी काय ?"

 "ह अरे तुम्ही शाळेत पर्यावरण विषय शिकता ना ! 

 ही पुथ्वी जमीन पाणी आपल्याप्रमाणेच साऱ्या पशुपक्षी न सजीवांचीच आहे. आपल्या साऱ्यांचे जीवनचक्र मुळी परस्परांवर अवलंबून आहे. म्हणूनच आपण पर्यावरणाचे, पाण्याचे रक्षक, 

 संवर्धन केले पाहिजे झाडे लावा झाडे जगवा. जंगले, अभयारण्ये वाढवा हे तत्व आपण अनुसरले पाहिजे. तुमच्या पुढच्या पिढ्यानां जर वाघ फक्त चित्रातच नव्हे तर खरे खरे बघायला मिळावेत असे वाटत असेल तर एकच करायचे झाडे वाढवा जंगले वाढवा पर्यावरणाचा तोल सांभाळत जगा आणि जगू द्या हा आजच्या बिबट्याचा संदेश आपण सारे पाळूयात ? कबुल ? 

 " हो नक्की " सारी मुले एका सुरात म्हणाली.जलसाक्षरता Essay  - Hydrocephalus in marathi:- [ Story 2 ]


जलसाक्षरता Essay, marathi essay,water images,
जलसाक्षरतापाण्याला जीवन असेही म्हटले जाते. पृथ्वीचा तीन - चतुर्थांश भाग पाण्याने वेढलेला आहे. तथापि, हे पाणी खारे असल्याने पिण्यास लायक नाही. पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या साठ्यापैकी 97% पाणी महासागरात खाऱ्या पाण्याच्या स्वरूपात आहे व 3 टक्के पाणी गोड्या पाण्याच्या स्वरूपात आहे. आपल्या देशातही उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण विषम स्वरूपात आहे. वाढती लोकसंख्या , भूगर्भातील पाण्याची घटणारी पातळी यामुळे पाण्याचा वापर करण्याची आणि त्यासाठी जलसाक्षरतेची गरज आहे. भारत हा नैसर्गिक साधन संपतीने विपुल असा देश आहे. त्यात भारतात सरासरी पावसाचे प्रमाणही चांगले आहे. पाइनटू या पडणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने हे पाणी जमिनीवर पडून वाहून जाते. ते अडवले जात नसल्याने ते थेट नदी, नाले, किंवा समुद्राला जाऊन मिळते. त्याचा काहीच उपयोग होत नाही. येत्या 10 वर्षात पाणी प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. खाऱ्या पाण्याला पिण्यायोग्य पाणी बनवण्याचे प्रयोग सुरू आहेत . परंतु ते फार खर्चिक असल्यामुळे ते भारतासारख्या देशाला परवडणारे नाहीत.

  पाण्याची गंभीर समस्या लक्षांत घेता जलसाक्षरतेचि आजघडीला खूप गरज आहे. विशेषता तुम्ही मुले यात महत्वाची भूमिका बजावू शकता. छोट्या छोट्या गोष्टींतूनही आपण पाण्याची बचत करू शकतो. त्याची सुरुवात आपल्याच घरापासून करता येईल. वाया जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती.

   घरात पाहुणे मंडळी आली असता त्यांना ग्लास भरून पाणी न देता अर्धा ग्लास पाणी द्यावे . घरात पिण्यासाठी किती पाणी लागते याचा अंदाज घेऊन भांडे भरून घ्यावे. पाणी कधीही शिळे होत नाही भरलेली पाण्याची भांडे रोज ओतुन देऊ नये. वापरलेले पाणी परसबागेतील किंवा कुंडीतील झाडांना टाकावे. झाडांना किंवा शेतात पाणी देण्यासाठी उत्तम शेती होईलच शिवाय त्या पिकांना मुळापर्यंत पाणी जाऊन त्याची यौग्य वाढ होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाचे पडणारे पाणी कसे साठवता येईल किंवा जमिनीत मुरवता येईल याचा विचार करा . आपल्याकडे राळेगणसिद्धी, हिवरेबाजार etc. ठिकाणी पाण्याच्या नियोजनाचे यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. या व अशा इतर ठिकानांना आवर्जून भेट द्या . लक्षात ठेवा पाण्याच्या प्रत्येक थेंबात जीवन दडलेले आहे आणि ते जपण्याची जवाबदारी आपली आहे.


Related Topics page content :

  • Marathi Goshti for kids and All .
  • मराठी छान छान गोष्टी.
  • छान छान गोष्टी मराठी pdf.
  • पंचतंत्र मराठी गोष्टी.
  • Marathi katha.
  • Moral Stories in Marathi.
  • marathi stories for kids pdf.
  • marathi story for kids pdf.
  • नवीन मराठी गोष्टी 50+

तुम्हाला ही marathi moral stories कशी वाटली आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कळवा व आणखी मराठी स्टोरी read करायच्या असेल तर आमच्या वेबसाईटवर visit करा Thank you.

techy akshay

Hello friends I am a writer and I am writing articles about Shayari, quotes and many more topic hope you like my post thank you❣️Hello Friends! Welcome To my www.hindi-shayari-collection.in hindi blog. This is one of the best Blogs for free information about Hindi shayari collection, motivational quotes in hindi, whatsapp status, Valentines day shayri,hindi love shayari & much more. Which can be very very helpful for your daily life. Share My post, Like My post, Comment On My post, S-U-B-S-C-R-I-B-E this website and stay tuned in this blog for further updates.

Please do not enter any spam link in comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post