मैलाचा दगड | Marathi Story for kids

 Marathi story for kids - मैलाचा दगड 

तुम्ही मराठी मद्धे तुम्ही तुमच्या मुलांसाठी मराठी छान छान गोष्टी शोधत असाल तर तुम्हाला ह्या page वर लहान मुलांच्या नवीन मराठी गोष्टी मिळेल.आणखी मराठी सुविचार, मराठीत बोधकथा , पंचतंत्र मराठी गोष्टी,All Animals च्या Marathi katha, Marathi Goshti for kids and All students.तुम्ही ह्या मराठी kids stories आता pdf मध्ये सुद्धा save करू शकता तुम्हाला offline असल्यावर हे pdf files नक्की मदत करेल, तुम्हाला आणखी गोष्टी माहीत असेल तर आम्हाला नक्की कळवा व तुम्हाला आमच्या ह्या गोष्टी आवडल्या तर ह्या page ला share करायला विसरु नका, व आणखी काही suggestions असेल तर आम्हाला नक्की कंमेंट करा. तर चला सुरू करूया 👇मराठी छान छान गोष्टी.

मैलाचा दगड - Marathi story ( सुरुवात )


Marathi story, Marathi ghoshti, marathi poetry,

Marathi story for kids



आज दिपकच्या आनंदाला पारावार नव्हता. त्याच्या वडिलांनी त्याला शैक्षणिक टूरला जाण्याची परवानगी दिली होती. त्याने झटपट आपल्या मित्राला फोन केला, त्याचे सर्व मित्रही हे एकूण खुश झाले. वास्तविक उद्या त्यांच्या शाळेतील काही निवडक मुले 10 दिवसांच्या शैक्षणिक प्रवासाला जाणार होते. या प्रवासात फक्त 6 वि ते 8 वि चे विद्यार्थी सहभागी होणार होते. दीपक सातवीत शिकत होता. दिपकची सर्व तयारी झाली होती. 

  दुसऱ्या दिवशी शाळेसमोर एक बस उभी होती. सर्वांना त्यांचे बसमधील सीट नंबर सांगण्यात आले होते. दिपकचे आई - वडील त्याला निरोप द्यायला आले होते. त्यांच्या वडील्लांनी त्याला प्रवासात सावधगिरी बाळगायला तसेच शिक्षक सांगतील ते ऐकण्याचा सल्ला दिला.

   त्यांच्या सल्ल्यावर दीपक हसत म्हणाला , पप्पा , तुम्ही मुळीच काळजी करू नका."

   थोड्या वेळाने बस निघाली. त्यांच्या बरोबर दोन शिक्षक होते.

   ते त्यांना राज्यातील काही प्रेक्षणीय स्थळे दाखवायला घेऊन चालले होते. बस राष्ट्रीय राजमार्गावर पोहचताच त्यांचे हिंदीचे शिक्षक शर्मा सर म्हणाले, "मुल्लान्नो, आपण सर्व आता आपल्या शहरापासून सुमारे ३०० किलोमीटर दूर मुंबईकडे चाललो आहोत. आपल्याला मुंबई आणि त्याच्या जवळची काही प्रेक्षणीय स्थळें पहायची आहेत हे आपणाला माहीतच आहे."

   "होय सर .... " सर्व मुले एका सुरात म्हणाली . दीपक एक जिज्ञासू वृत्तीचा विध्यार्थी होता. त्याने लगेच विचारले , "सर, एक प्रश्न विचारू का ?"

   "जरूर बेटा .." ही टूर आपण आपले ज्ञान वाढविण्यासाठी ठेवली आहे." ....Marathi Goshti for kids....

   दिपकने विचारले , "सर , आपणाला कसे कळले की, आपण ३०० की.मी चा प्रवास करणार आहे."हे ऐकून सर्व मुले हसली. त्यांच्या हसण्यांमुळे दिपकचा चेहरा हिरमुसला झाला.

   त्याला वाटले की, त्याने काही चुकीचे विचारले आहे. त्यावर शर्मा सर म्हणाले, "यात हसण्यासारखे काय आहे ? दिपकचा प्रश्न अगदी बरोबर आहे. चला आता , हसणार्या मुलांपैकी यखांद्याने सांगा की, आपल्याला याखांद्या क्षेत्राचे अंतर कसे समजते ?" सरांचा हा प्रश्न ऐकून संपूर्ण बसमध्ये शांतता पसरली. सर्व जण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले.

   इकडे तिकडे पहिल्या नंतर शर्मा सर म्हणाले, "मुलांनो" माझ्या हातात एक पुस्तिका आहे, तिला आपण अटलॉस असे म्हणतो. यामध्ये संपुर्ण भारताच्या रोडचा नकाशा (मॅप) आहे. यामध्ये आपल्याला जेथे जायचे त्याचे अंतर आणि दिशेची माहिती मिळते. अनेक पर्यटक आणि टुरिस्ट guide हे आपल्याबरोबरच ठेवतात." सर्व मुले त्या अटलॉसकडे पाहू लागली.

   "काही समजले का दीपक ? " सरांनी विचारले तेव्हा तो हळूच म्हणाला , "काही काही समजले सर ."

   "काही काही म्हणजे ?" सरांनी पुन्हा विचारले. "सर, ही गोष्ट तर मला समजली परंतु...."

   "परंतु काय बेटा, हे बघ, तुला काय म्हणायचे ते स्पष्ट सांग. प्रश्न विचारल्याने आपले ज्ञान आणखी वाढेल आणि आपला प्रवास यशस्वी ठरेल. त्याशिवाय वेळेचाही सदुपयोग होईल." सरांनी त्याची हिम्मत वाढविण्यासाठी म्हटले.

   दीपक म्हणाला , "या roadmap मूळे आपल्याला अंतर आणि दिशा यांची माहिती मिळेल , परंतु प्रवास चालू असताना कसे समजेल की , जेथे आत्ता आपण आहोत तेथुन मुंबई कोति किलोमीटर अंतरावर आहे ? " यावर शर्मा सर म्हणाले, "दीपक , तू फार चांगला प्रश्न विचारला आहे. सर्व मुलांनी खिडकीच्या बाहेर पहा. थोड्याच वेळात रस्त्याच्या कडेला एखाद्या चोकौनी दगड रोवलेला दिसेल. प्रथम तो सर्वांनी पहा. " सर्व मुले बाहेर डोकावू लागले. ....Marathi Goshti for kid...

   तेवढ्यात एक मुलगा ओरडला, "दिसला सर, एक पांढरा दगड ...वर काहीसे पिवळे आहे ."

   "होय मुलांनो, तुम्हा सर्वांना मी यांविषयी सांगणार आहे." सर लगेच म्हणाले.

   "सांगा सर, फार मजा येईल ." एक मुलगा पटकन म्हणाला . शर्मा सर म्हणाले , "जेव्हा आपण किंवा तुम्ही सडक मार्गावरून प्रवास करतो त्यावेळी सडकेच्या कडेला काही मैलाचे दगड दिसतात."

   "मैलाचा दगड..." दिपकने आश्चर्याने विचारले.

   "होय बेटा, मैलाचा दगड..सडकेच्या कडेला रोवलेल्या दगडांना मैलाचे दगड म्हणतात ." सरांनी दीपकच्या शंकेला उत्तर देत म्हटले. नंतर ते पुन्हा सांगू लागले, "या मैलाच्या दगडावर ज्या शहराकडे आपण जात असतो , त्याचे अंतर लिहिलेले असते. अर्थात बऱ्याच वेळा लोक त्यांच्या रंगाकडे फारसे लक्ष देत नाही.

   त्यांचे रंग फार महत्वाचे असतात."

   " त्यांचे रंगही वेगवेगळे असतात ?"दिपकने विचारले .

   सरांनी मान हलवत म्हटले, "हो बेटा, त्यांचे वेगवेगळे रंग असतात . अर्थात निम्यापैकी जास्त पांढरा रंग सर्वांमध्ये असतो.

   वरचा काही भाग वेगळ्या रंगाचा असतो."

   "कोणकोणते रंग असतात सर ? , आणखी एका मुलाने विचारले. सरांना आता असे वाटू लागले की, सर्व मुले त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत आहेत.

   शर्मा सर सांगू लागले, "मुलांनो, जर आपणाला मैलाचा दगड पिवळ्या आणि पांढरा रंगाचा दिसला तर समजायचे की, आपण भारतीय राष्ट्रीय वरून प्रवास करत आहोत. राजमार्ग प्राधिकरण म्हणजे "नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया, या सडक मार्गांनी देखरेख व व्यवस्थपणाचे काम करते."

   "सर, राष्ट्रीय राजमार्ग म्हणजे काय ?" दिपकजवळ बसलेल्या एका मुलाने विचारले. सरांनी हसत उत्तर दिले,

    "जो मार्ग एका राज्यातून दुसऱ्या राज्याला जोडतो त्याला राष्ट्रीय राजमार्ग म्हणजेच नॅशनल हायवे म्हणतात. सध्या भारतात राष्ट्रीय राजमार्गाची एकूण लांबी सुमारे 76 हजार 818 किलोमीटर आहे.

    शर्मासरांचे बोलणे ऐकल्यावर दिपकने विचारले, "सर, मी एकदा हिरवा आणि पांढऱ्या रंगाचे दगडही पहिला होता."

    "नक्कीच पहिला असेल हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे मैलाचा दगड . जेथे राज्य महामार्ग असेल अशा ठिकाणी बसवलेले असतात . हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे दगड एका राज्यातील अंतर दाखवतात . त्याला स्टेट हायवे म्हणतात. या राजमार्गाची देखभाल करण्याची जवाबदारी राज्य सरकारची आहे."

    "आणखी कोणत्या रंगाचे असतात मैलाचे दगड ...?"

....Marathi Goshti ...

बसमधील सर्वात पुढच्या रंगेवरील सीटवर बसलेल्या मुलाने विचारले.

 "याशिवाय काळ्या आणि निळ्या पट्टीचे दगडही असतात.

 ते असे सांगतात की, आपण एखांद्या मोट्या शहरात किंवा जिल्ह्यात सिमेंत प्रवेस केला आहे.' सरांनी लगेच उत्तर दिले.

  "वा, सर मजा वाटली. आम्हाला ही एवढी माहिती नव्हती." तो मुलगा म्हणला. तेवढ्यात रामू नावाचा मुलगा पुटपुटला. "तिरंगी झेंड्यातील तीन रंगापैकी दोन रंग या मैलाचं दगडांमध्ये मिळाले.

  केशरी रंग असता तर बरे झाले असते, आमच्या किती पटकन लक्षात राहीले असते."

  "काय म्हणतो रामू ? जरा मोठ्याने सांग ना."

  "सर, मला असे म्हणायचे होते की, एखांद्या मैलाच्या दगडावर रंग केसरी असता..."

  "अरे हो, चांगली आठवन करून दिली रामू तू.

  खरोखर केसरी आणि पांढरा रंगाचे दगडही सडकेच्या कडेला बसवलेले असतात. हे दगड आपण खेड्यातील रस्त्यावर पाहू शकता . या रंगाच्या दगडाचा अर्थ आपण एखादा ग्रामीण सड केवर आहात. हा रंग प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचाही सूचक आहे." शर्मा सरांनी रामुला उत्तर देतांना सांगितले.

  बस वेगाने पुठे जात होती, सर्वांना फ़ारच चांगली माहिती मिळाली होती. सर्व मुले आपसात मैलाचं दगडाची चर्चा करीत होते. अचानक बसचा वेग कमी होऊ लागला . त्यावेळी दुसरे शिक्षक शिंदे म्हणाले, "मुलांनो, थोडा वेळ बस येथे थांबेल. आपण   

  सर्व जण लघुशंकेला वगैरे जाऊ शकाल."

   बस थांबताच दिपकची नजर तेथे असलेल्या मैलाच्या दगडाकडे 

   गेली. तो पाहताच त्याने शर्मा सरांना म्हटले , "सर, तो पहा पिवळ्या पांढरा रंगाचा मैलाचा दगड..

   ते हसून म्हणाले , "हो बेटा, हा आहे मैलाचा दगड.जो रस्स्यावर आपला मार्गदर्शकही असतो."

 दीपकला नवीन माहिती मिळाल्याने तो फार खुश होता.त्याने ठरवले होते घरी परत जाताच धाकट्या शांताला सुध्दा ही माहिती सांगायची. ...Marathi Goshti for children...



Related Topics page content :

  • Marathi Goshti for kids and All .
  • मराठी छान छान गोष्टी.
  • छान छान गोष्टी मराठी pdf.
  • पंचतंत्र मराठी गोष्टी.
  • Marathi Stories For kids.
  • Marathi katha.
  • Moral Stories in Marathi.
  • marathi stories for kids pdf.
  • marathi story for kids pdf.
  • नवीन मराठी गोष्टी 50+.
  • 10+ मराठी गोष्टी चांगल्या.
  • 50+ मराठी गोष्टी चांगल्या
  • Marathi Story for kids pdf
  • Marathi Goshti pdf
  • Marathi Story for reading
  • छान छान गोष्टी मराठी pdf.
  • छान छान गोष्टी डाउनलोड
  • नवीन मराठी छान छान गोष्टी दाखवा
  • पऱ्यांच्या छान छान गोष्टी.
  • marathi story with moral
  • small small story in marathi.

तुम्हाला आमची ही marathi Goshti कश्या वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा व तुम्हाला आणखी अशाच मराठी moral stories पाहिजे असेल तर आमच्या वेबसाईटवर visit करा (home page) आणि मराठी कथा ( story( search करा.तुम्हाला आणखी काही suggestion द्यायचे असेल तर तुम्ही खालील comment box मध्ये नक्की विचारा नाही तर तुम्ही मला contact सुद्धा करू शकता। अशाच Storysathi फोल्लो करा. thank you.

techy akshay

Hello friends I am a writer and I am writing articles about Shayari, quotes and many more topic hope you like my post thank you❣️Hello Friends! Welcome To my www.hindi-shayari-collection.in hindi blog. This is one of the best Blogs for free information about Hindi shayari collection, motivational quotes in hindi, whatsapp status, Valentines day shayri,hindi love shayari & much more. Which can be very very helpful for your daily life. Share My post, Like My post, Comment On My post, S-U-B-S-C-R-I-B-E this website and stay tuned in this blog for further updates.

Please do not enter any spam link in comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post