Marathi Story - Marathi Goshti Read Online - जलद दूत

 जलद दूत - Marathi Story - Marathi Goshti Read 

तुम्ही मराठी मध्ये गोष्टी search करत असाल तर तुम्हाला इथे 100+ बेस्ट मराठी गोष्टी मिळेल ज्या तुम्हाला नक्की आवडणार आहे , marathi goshti, marathi story for kids, मराठीत गोष्टी, बोधकथा, मराठी सुविचार, अशा प्रकारच्या सर्व गोष्टी आमच्याकडे उपलब्ध आहे. Marathi Goshti read ...

जलद दूत - Marathi Goshti Read 

Marathi Goshti Read , marathi story, marathi stories,


Marathi Goshti Read 



मित्रमैत्रिणीनो कल्पना करा , तुम्ही एखाद्या डोंगरावर फिरायाला गेला आहात आणि तिथून तुम्हाला तुमच्या मित्रा/मैत्रिणीला सांगावस वाटत की ही जागा फार भारी आहे . मला तुझी खूप आठवण येतेय. कस सांगाल ? काय म्हणालात ? फोन करू ? मेसेज करू ? समजा फोनबिन काही नाहीये. तर काय कराल ? मित्रांनो, साधारण दीड हजार वार्षपूर्वी ची गोष्ट. आषाढ महिण्याचे दिवस होते . आषाढ म्हणजे आताचा june/july महिना . एका माणसाला पर्वत माथ्यावर गच्च पाण्याने भरलेला एक ढीग दिसला. तो कृष्णमेघ ( म्हणजे पाण्याने भरलेला , म्हणून काळा दिसणारा ढग ) काही स्थिर नव्हता. ढग कधी एका ठिकाणी स्थिर असतात होय. ते तर तरंगत निघालेले असतात ? कुठे निघालेले असतात ?

  तुम्ही बघितलं असेल , आपल्याकडे पावसाच्या दिवसात आलेला ढग कुठुन येतो आणि कुठे जातो. तो नैऋत्येस येतो आणि उत्तरेकडे जातो. म्हणून तर आपल्याकडेच्या पावसाला नेरुत्य मोसमी पाऊस म्हणतात ना ! तर असा हा मेघ नैऋत्येस आला होता. एका छानशा पर्वताच्या माथ्यावर तो छानसा टेकला होता. मोठं विलोभनीय दृश्य होत ते. एखाद्या मोठा हत्तीच जसा काही खेळकरपणे मस्ती करत बसला होता. दिंड हजार वर्षांपूर्वी ही भारतात नैऋत्येस मेघ आला होता. आणि तो एका कवीने पहिला होता . आणि त्याच बघण्याच गाणं झालं. कवी म्हणाला

   आषाढ च्या मेघांनी वेढलेले पाहिल्या दिवशी पर्वताच शिखर मोठ देखणं दिसलं. पूर्वी छोट पिल्लू असणारा हत्ती आता मोठा झालाय आणि आता मोठ्या हत्तीप्रमाणे बलवान आणि खेळकर झालाय. पर्वतशिखरावरील तो मेघही असाच तर आहे ! ढग छोटा-छोटा होताना तुम्ही बघितला आहे का ? कदाचित ढगांचे आकार बघायला तुम्हांला आवडत असेल. कोणत्या कोणत्या प्रकारचे / आकाराचे ढग बघितलं आहेत तुम्ही आकाशात ? फ्लॉवरच्या गडद्यासारखे ? पिसार्यासारखे ? आता संधी मिळाली की नक्की बघा ... ढगांचा अभ्यास ही काही साधीसुधी गोष्ट नाही बर का, माणसाने तो फार पूर्वीपासून केलाय. का बर केला असावा ? कारण त्याला समुद्र पार करायचा होता, शेती करायची होती. ढग बेटे मजेत चालले होते , पण माणसाने त्यांना डोळे भरून पाहिले , पुन्हा पुनहा पाहिले . ते कसे जातात कसे येतात , सगळं त्यांनी अभ्यासल. Marathi Goshti Read .....

    पण वरच्या काव्यमय ओली ज्याला सुचल्या तो काही मेघाकडे या दृष्टीने बघत नव्हता . त्याला काही कुठे समुद्र ओलांडून जायचं नव्हतं. पर्वतमाथ्यावरच्या गोजीरा मेघ बघून त्याच्या काळजात काहीतरी झालं . एक शिरशिरी, एक उल्हास...आणि त्याच्यातच त्याने काव्य लिहिलं मेघदूत..कवीचं नाव होत ....कालीदास .

    आज या मेघदूताची गोष्टच आपण ऐकणार आहोत.

या आधी ना अस घडलं होत ना कुणी विचारही केला होता. एका निर्जीव अचेतन मेघाला आपला दूत बनवायचं ? कोणी सांडनिस्वार नाही , कबुतसुद्दा नाही. एक काळा थोरला मेघ . पण एकदा मान उंचावून, डोळे भरून आकाशातल्या काळ्या मेघाकडे पहा तर खर, सगळी जादू समजेल.

    कालिदासाच्या गोष्टींतला यक्ष असाच डोळे भरून बघतो आहे, त्याची पत्नी दूर हिमालयाच्या पायथ्यापाशी वसलेल्या अल्कानगरीत आहे. यक्षाला तिच्यापासून खूप लांब , रामगिरी नावाच्या पर्वतावर राहावं लागतंय . पावसाळा आलाय तर त्याला तिची खूप आठवण येते आहे . पण हे सगळं तिला सांगायच कस ? कोण तिच्यापर्यंत त्याचा सांगावा घेऊन जाईल ? त्याने कृष्णमेय पहिला आणि त्याच्यापाशीच आपलं मन मोकळं करायचं ठरल. त्या कृष्णमेघला त्यानं सांगितले, माझ्या नगरिपर्यंत जा आणि माझ्या पत्नीला माझा निरोप सांग. ही निरोपाची कथा म्हणजे मेघदूत ! Marathi Goshti Read ....

    आपण पत्र पाठवतो, कुरिअर करतो, जेव्हा काय करतो ? पत्ता नीट लिहितो, हो ना ? तो नाही लिहिला तर मग सगळं कामच संपलं. पण आपला पत्ता दोन तिन ओळींत संपतो. समजा आपला पत्ता आपल्या मनासारखा लिहायचा अस आपण ठरवलं तर ? म्हणजे बघा ह, मला माझ्या मैत्रिणीला पत्र पाठवायचे आहे. आणि मी पोस्टमन काक्कांना सांगते आहे, बर काका, माझ्या मैत्रिणीला घरी चालतात ना, तर तुम्हाला टेकडीच्या दुसऱ्या बाजूला जायचे आहे. तुम्हाला तो रस्ता खूप आवडेल. वाटेत माज्या आजीचं घर आहे, ती तुम्हाला खाऊ देईल, पण तुम्ही तिथे थांबू नका. टेकडीला वळण घालून एक रस्ता जातो, त्या रस्त्याच्या बाजूने उंच झाड आहेत, बुचच्या फुलांनी. तिथे खूप सुंदर वास पसरतो पावसाळ्यात, आणि रस्त्यावर अगदी सडा पडतो. तिथे वाकून फुले वाचावीत असा मोह तुम्हाला नक्की होईल, पण तुम्ही तिथे थांबू नका, माज्या मैत्रिण वाट बघत असेल ना. आणि मग जिथे लाल विटाच घर दिसेल, बाहेर एक गबरु कुत्रा खेळत असेल ते माझ्या मैत्रिणीच घर. आपल्या मित्र किंवा मैत्रिणीकडे जाण्याचा पत्ता जर असा सांगायचा ठरवला तर आपण काय काय बर लिहू ? तुम्ही लिहा आणि काय लिहिता आहेत ते मलाही कळवा. कालिदासाने पत्ता कसा सांगितला ? खर सांगते मित्रांनो, इतका सुंदर पत्ता मी कधीच एकला नव्हता. कालिदासाच्या रामगिरी पर्वत होता भारताच्या माथ्यावर. तिथून तो जाणार होता हिमालयाच्या पायथ्याशी. केव्हढा मोठ्ठा प्रवास. अगदी भार तदर्शन म्हणा ना. भारताच्या भूमीवरून एक मेघ तरंगत जाणार आहेत. त्याला भारत भूमी दिसणार आहे. कालिदास त्याला खास त्याचा शैलीत ही भूमी दाखवणार आहे. काय मजा ना ! नागपूर जवळ रामटेक नावच ठिकाण आहे. तोच मेघदूत या काव्यातला रामगिरी पर्वत असावा . तिथून मेघाच्या प्रवासाची सुरुवात होते. दीड हजार वर्षांपूर्वी काय, उन्हाळ्यात मध्य भारत खूप तापतो, अंगाची लाही लाही होते. आणि मग जुन महिना संपता संपता तिथे पावसाची सुरुवात होते. पावसाचं आगमन सगळीकडे काही एकाच वेळी होत नाही हे तुम्हाला ठाऊकच आहे. पुण्यात त्याच आगमन सात जूनला होत अस लोक ठरून चालतात. पावसाला तारीख कळत असेल का ? पुण्यात येण्याचा आधी तो केरळात येतो, गोव्यात येतो आणि मग पुण्यात पोचतो. आपल्या गावी तो कधीच येतो ? Marathi Goshti Read .....

    रामगिरील तो पोहचायला पुण्यापेक्षा उशीरच होतो. म्हणजे पुण्यात पाऊस ज्येष्टत पडायाला सुरुवात होत असेल तर रामगिरील आषाढ सुरू होण्याची वाट बघावी लागणार ना ! गोष्टींत पुठें काय होत हे समजण्यासाठी आपल्यालाही पुढच्या महिन्याची वाट बघावी लागणार ना ! 

    तोवर एक छानसं पत्र आणि एक छानसा पत्ता मला पाठवून ठेवा...

    आणि हो, एक शेवटच्या प्रश्न. या लेखात नाव जलद दूत अस का बरं ठेवलं असेल ? Marathi Goshti Read .....


Read more:सिडची गोष्ट  Marathi goshti pdf

Read more:Marathi story for kids - मैलाचा दगड 

Read more:Marathi story for kids | वाघोबाची गोष्ट

Read more:Months In Marathi And festivals in each Marathi month

Read more: Fruits images with names in marathi



Page content:-

  • marathi bal goshti read
  • marathi goshti new
  • marathi bhutachya goshti read
  • marathi story reading
  • marathi story reading online
  • marathi love story reading
  • Marathi goshti pdf
  • Marathi story pdf 
  • Marathi story for kids
  • Marathi story
  • Marathi Katha
  • Marathi Goshti video
  • Marathi Goshti pdf download
  • Marathi poem
  • Marathi Goshti for kids and All .
  • मराठी छान छान गोष्टी.
  • छान छान गोष्टी मराठी pdf.
  • पंचतंत्र मराठी गोष्टी.
  • Marathi Stories For kids.
  • Marathi katha.
  • Moral Stories in Marathi.
  • marathi stories for kids pdf.
  • marathi story for kids pdf.
  • नवीन मराठी गोष्टी 50+.
  • 10+ मराठी गोष्टी चांगल्या.
  • 50+ मराठी गोष्टी चांगल्या
  • Marathi Story for kids pdf
  • Marathi Goshti pdf
  • Marathi Story for reading
  • छान छान गोष्टी मराठी pdf.
  • छान छान गोष्टी डाउनलोड
  • नवीन मराठी छान छान गोष्टी दाखवा
  • पऱ्यांच्या छान छान गोष्टी.
  • marathi story with moral
  • small small story in marathi.


तुम्हाला आमची ही marathi Goshti कश्या वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा व तुम्हाला आणखी अशाच मराठी moral stories पाहिजे असेल तर आमच्या वेबसाईटवर visit करा (home page) आणि मराठी कथा ( story( search करा.तुम्हाला आणखी काही suggestion द्यायचे असेल तर तुम्ही खालील comment box मध्ये नक्की विचारा नाही तर तुम्ही मला contact सुद्धा करू शकता। अशाच Storysathi फोल्लो करा. thank you

techy akshay

Hello friends I am a writer and I am writing articles about Shayari, quotes and many more topic hope you like my post thank you❣️Hello Friends! Welcome To my www.hindi-shayari-collection.in hindi blog. This is one of the best Blogs for free information about Hindi shayari collection, motivational quotes in hindi, whatsapp status, Valentines day shayri,hindi love shayari & much more. Which can be very very helpful for your daily life. Share My post, Like My post, Comment On My post, S-U-B-S-C-R-I-B-E this website and stay tuned in this blog for further updates.

Please do not enter any spam link in comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post