अपूर्ण/चालू भूतकाळ - Past Continuous Tense In Marathi
तुम्हाला Past Continuous Tense बद्दल माहीत पाहिजे असेल तर तुम्हाला इथे अपूर्ण/चालू भूतकाळ ची सर्व माहिती इथे उपलब्ध आहे हि माहिती read करून हा tense तुम्ही learn करू शकता आम्ही Past continuous tense sentences खाली दिलेले आहे with formula easy हि सगळी माहीती तुम्ही नक्की read करा.
Past Continuous Tense In Marathi
भूतकाळातील अपूर्ण क्रिया दाखवता येते का ? तर येते. भूतकाळात घडलेल्या काहि क्रियांविषयीं बोलत असताना त्या वेळेस थोडा वेळ चालू राहिलेली क्रिया आपण चालू भुतकाळात सांगतो . अपूर्ण क्रियेसाठी सहाय्यकारी क्रियापद लागते हे तुला माहीत आहे. चालू वर्तमानकाळ वापरतांना आपण बघितलं की तो आत्ता चालत आहे, ती सध्या लिहीत आहे , त्यांचा प्रकल्प गेले वर्षभर चालू आहे , तो आज काहीच बोलत नाही, यात आहे/नाही या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग मुख्य क्रियापदाचे अपूर्ण/चालू रूप दाखवण्यासाठी केला जातो.
आपण भूतकाळातील अपूर्ण क्रिया पाहण्यासाठी वर्तमानकाळा तील अपूर्ण क्रिया कशी पाहतो याची आठवण करून घेऊ.
वर्तमान काळात आत्ता / या क्षणी चालू असणारी क्रिया म्हणजे अपूर्ण क्रिया. ती जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा ती चालू असते. ती काही काळापूर्वी चालू झालेली असते आणि काही काळानंतर संपणार असते हे नक्की. म्हणूनच तिथे now, presently, these days असे ती क्रिया आत्ता चालू आहे असे दर्शवणारे शब्द असतात . तुम्हाला जेव्हा अपूर्ण/ चालू वर्तमानकाळ वापरायचा असेल तेव्हा तुम्ही ते नक्कीच घाला म्हणजे तुम्हांला त्याचा अर्थ लक्षात येईल.
आता भूतकाळातील अपूर्ण क्रिया सांगायची म्हणजे काय ? तर भूतकाळातील एखादी घटना आपण सांगत असतो तेव्हा त्या घटनेत एखादी थोडा काळ चालू राहिलेली क्रिया सांगते . ती क्रिया अपूर्ण होती/ पूर्ण झालेली नव्हती हे सांगायचे झाले तर अपूर्ण भूतकाळ वापरतो. तिथे then, that time असे त्यावेळी चालू असणारी क्रिया सांगत असताना साधा आणि अपूर्ण क्रिया यांच्या वापरात कोणता फरक आहे ? साधा भूतकाळ केव्हा वापरतो ? तर एखादी क्रिया त्याच वेळेस पूर्ण झाली होती असे सांगायचे असेल तर साधा भूतकाळ वापरतो. भूतकाळातील अपूर्ण क्रिया भूतकाळात असेल हे खरे. म्हणजे वर्तमान काळतती नसते . पण भूतकाळात असताना थोडा वेळ चालू असलेली क्रिया आपल्याला सांगायची असते तेव्हा अपूर्ण/चालू स्तिथी दाखवणारे रूप वापरतो. आपण सांगून बघूया अशी एखादी घटना......
पाच वर्षांपूर्वी आम्ही माथेरानला गेलो होतो. तेव्हा त्या छोट्या आगगाडीतून चाललो होतो. अचानक पावसाळी ढग खाली आले. त्यांनी सगळा आसमंत धुक्याने भरून टाकला . पण आमची गाडी डोंगर चढत होती. ढगांमधून ती झुक झुक जातच होती.
म्हणजे आपण पाच वर्षांपूर्वी घटना सांगतो आहोत . उघडच आहे की भूतकाळ आहे. मात्र त्यातही एक क्रिया चालू होती असे सांगितले आहे . आम्ही चालतो होतो, गाडी डोंगर चढत होती, ढगांमधूनही झुक झुक जातच होती. ती क्रिया चालू होती असे सांगितले आहे. आशा क्रियेसाठी अपूर्ण रूप वापरण्याची गरज पडते. हीच वाक्ये इंग्रजीत घालायची असतील तर आपण कसे म्हणू ?
We went to Matheran five years ago. That time we were going in the tiny train and suddenly rain clouds came down. They covered the whole terrain. And yet our train was climbing the mountains. It was going jhug...jhug.... through the clouds.
कोणती क्रियापदे अपूर्ण भूतकाळात आहेत ? चाललो होतो, चढत होती, जात होती ही ती अपूर्ण क्रिया दाखवणारी क्रियापदे.
चढणे या क्रियापदाचे अपूर्ण रूप करताना कोणते बदल झाले ? तर त्याला ने च्या ऐवजी त प्रत्यय लागला आणि सहाय्यकारी होणे या क्रियापदाचे भूतकाळी रूप आले चढत होती. इंग्रजीत कोणते सहाय्यकारी क्रियापद येते ? आपण वर्तमानकाळाचे अपूर्ण रूप पाहतांना एक सूत्र ठरवले होते. आठवते का ?
अपूर्ण वर्तमानकाळाचे एक सूत्र आहे. ते म्हणजे to be+ main verb + ing
हे आपण एप्रिल 19 च्या लेखात बघितले आहे. हेच सूत्र अपूर्ण भूतकाळातही लागू होते. फक्त तिथे भूतकाळ दाखवताना लश या सहाय्यकारी क्रियापदाच्या रूपात बदल होतो. तिथे am/is/are च्या ऐवजी was/were अशी रूपे येतात. बाकी मुख्य क्रियापदाचे रूप अपूर्ण वर्तमानकाळात असते तसेच इथेही असते.
Past Continuous Tense formula In Marathi
म्हणजे कोणत्याही क्रियापदाचे अपूर्ण स्थितीतील रुप be+ main verb + ing या सूत्राने होते, मग काळ कोणताही असू दे.
अपूर्ण/चालू वर्तमान काळ. अपूर्ण/चालू भूतकाळ
Past continuous tense sentences in marathi
Was/were using
- I am going to Delhi.
- I was going to Delhi. P.C.T
- We are watching a movie.
- We were watching a movie.P.C.T
- You are standing there.
- You were standing there.P.C.T
- He/she/it is running.
- They are running.
- He/she/it was running.P.C.T
- They were running.P.C.T
अपूर्ण क्रिया समजून घेण्यासाठी आपण काही वाक्ये बघू. म्हणजे भूतकाळातील साधी क्रिया आणि अपूर्ण क्रिया यांच्यातील फरक तुमच्या लक्षात येईल.
Q & A Tense in marathi
What is present tense in Marathi?
Ans:- present tense म्हणजे वर्तमान काळ होय.
What is the meaning of past perfect tense in Marathi?
Ans:- past perfect tense म्हणजे पुर्ण भूतकाळ होय.
What is meant by continuous tense in Marathi?
Ans:- continuous tense म्हणजे चालु काळ होय.
पुढील वाक्ये साधा भूतकाळ आणि चालू / अपूर्ण भूतकाळाने जोडुन लिहा.
Page content :-
- Past continuous tense examples
- Past continuous tense definition in Marathi
- past continuous meaning in marathi
- definition of tense in marathi
- past tense in marathi
- simple past tense sentences
- simple past tense in marathi language
- सिम्पल पास्ट टेन्स एक्झाम्पल
- simple past tense in marathi translation
Read more:सिडची गोष्ट Marathi goshti pdf
Read more:Marathi story for kids - मैलाचा दगड
Read more:Marathi story for kids | वाघोबाची गोष्ट
Read more:Months In Marathi And festivals in each Marathi month
तुम्हाला apurn chalu bhutkal समजला असेल, तुम्हाला काही शंका असेल तर खाली नक्की कंमेंट करा व तुम्हाला या tense चे आणखी काही sentenses पाहिजे असेल तर कंमेंट मध्ये सांगा.व काही दुरुस्ती असेल तर आम्हाला कळवा.